५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सुरू होणार शाळा

school will start with 50 teachers and teaching staff

मुंबई : सात महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे (Lockdown) बंद असलेल्या शाळा सुरू होणार. याबाबत राज्य सरकारने नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे. शाळा-महाविद्यालय शैक्षणिक संस्थांमधील (educational institutions) ऑनलाईन, ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय, खासगी, अनुदानित, विना अनुदानित सर्व शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू व्हावे  लागणार आहे. ५० टक्के क्षमतेने उपस्थिती राहता येणार आहे. याआधी १४ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने ‘अनलॉक’ची नवीन नियमावली जाहीर केली होती. यात शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ५० टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येण्यास परवानगी देण्यात आली होती. ५० टक्के शिक्षकांना शाळेत येण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, ३१ ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहे.

नवा आदेश

  • राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था दिनांक ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण आणि दुरस्थ  शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
  •  ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण/ दुरस्थ  शिक्षण / Tele-Counselling आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खासगी, अनुदानित, विना अनुदानित इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ऑनलाईन/ ऑफलाईन / दुरस्थ शिक्षणाशी संबंधित  कामांसाठी तत्काळ कामावर रुजू व्हावे.
  • शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये देण्यात आल्या आहेत. तसंच या विभागाच्या संदर्भाधीन दिनांक १५ जून, २०२० च्या परिपत्रकातील सूचनांचे पालन करण्यात यावे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER