२३ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात शाळा सुरू होणाचे शिक्षणमंत्री गायकवाड यांचे संकेत

Varsha Gaikwad - School

मुंबई : दिवाळीनंतर (Diwali) महाराष्ट्रातील शाळा (School) प्रत्यक्ष उघडण्याचे संकेत राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार दहावी आणि बारावीचे‌ वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा‌ विचार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली. त्यामुळे दिवाळीनंतर विद्यार्थी शाळेत दिसण्याची शक्यता आहे.

२३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात एसओपी तयार करण्यात आला असून त्याबाबत केवळ मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी मिळणं बाकी आहे. कशा पद्धतीनं शाळा सुरू करण्याचं नियोजन असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याबाबत नियमावली, सूचनाही अद्याप जाहीर झालेल्या नाही. अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER