
मुंबई : राज्यात आलेल्या कोरोनाच्या साथीमुळे ३१ मेपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
आठवड्यात ४८ तास शाळा
महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्यानंतर त्या आठवड्यातील ४८ तास सुरू राहतील. शनिवार-रविवारी सुटी देणाऱ्या शाळांना ही मुभा देण्यात आलेली नाही. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि १५ इतर प्रमुख शहरे ‘रेड झोन’मध्ये आहेत. मात्र हळूहळू शाळा सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करते आहे, असे वर्षा गायकवाड यांनी एका मुलाखतीत सांगितले. शाळांचे तास कमी करण्याचा विचार सुरू आहे. शाळांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक राहील. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल.
दोन पर्यायांचा विचार
पर्याय पहिला- विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑड आणि इव्हन नंबरप्रमाणे दोन शिफ्टमध्ये (सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात) बोलवायचे. पर्याय दुसरा – प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे दोन गट करायचे व त्यांना एक दिवसाआड शाळा ठेवायची. राज्य सरकार या दोन्ही पर्यायांचा विचार करते आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला