सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी

mhnews2 6

सांगली : अतिवृष्टीमुळे तसेच कोयना व वारणा धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पलूस, मिरज, वाळवा या तालुक्यातील रस्ते व पूल पाण्याखाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये याकरिता सांगली जिल्ह्यातील पलूस, मिरज आणि वाळवा तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना बुधवार, दि. 14 ऑगस्ट 2019 रोजी सुट्टी जिल्हा प्रशासनातर्फे घोषित करण्यात आली आहे.