कोल्हापुरात शाळांची घंटा टप्प्याटप्प्याने

School

कोल्हापूर : शासनाने उद्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी घाईगडबडीने शिक्षण संस्थाचालकांनी शाळा सुरू करू नयेत. ज्याशाळांची तयारी झाली आहे आणि पालकांनी संमतीपत्र दिले आहे त्यांनी शाळा सुरू कराव्यात, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा उद्या सुरू होऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले. ७ डिसेंबरपर्यंत टप्प्याटण्प्याने सर्व शाळा सुरू करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. जिल्ह्यातील जवळपास २०० शिक्षण संस्थाचालकांना तशा सूचना दिल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात स्वॅब दिले आहेत. त्यांचा अहवाल येण्यास आणखी दोन दिवस लागतील. त्यामुळे शिक्षकांचे स्वॅब घेण्याचे सध्या बंद केले आहे. मंगळवार (दि. २४) पासून ९ वी ते १२ वीपर्यंतच्या शिक्षकांचे स्वॅब घेण्यास सुरुवात होईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER