स्कॅनिया बस कंपनीच्या वाहनखरेदीत घोटाळा, काँग्रेसचा आरोप

Scania bus company vehicle purchase scam, Congress alleges

मुंबई :- २०१५ साली नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे परिवहन मंत्री असताना स्केनियाने भारतात बस कारखान्याचे उद्घाटन केले होते. यावेळी स्वीडिश पायाभूत सुविधा मंत्री अण्णा जोहानसन उपस्थित होते. मात्र देशात नागपूर महापालिकेपासून कोल इंडियापर्यंत स्कॅनिया बस, (Scania bus company vehicle purchase scam) ट्रक कंपनीने पुरवलेल्या वाहनांच्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप प्रदेश काँग्रेसतर्फे शुक्रवारी मुंबईत करण्यात आला. एका मंत्र्याच्या मुलीच्या लग्नासाठी लक्झरी बस भेट देणे तसेच अनेक गाड्यांचे चेसीस नंबर, नंबर प्लेट बदलून कोल इंडियाच्या उपकंपनीला नव्या गाड्या विकल्याचा गंभीर प्रकार घडल्याचा दावा करून, या कथित घोटाळ्याची चौकशी एनआयएमार्फत करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते डॉ. संजय लाखे पाटील (Sanjay Lakhe Patil) यांनी केली आहे.

स्कॅनिया’ने विशेष सुविधांनी युक्त असलेली एक बस नितीन गडकरींना दिली होती. ती बस त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी वापरली गेली आणि त्यासाठी संपूर्ण मोबदलाही घेतला गेला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईतील गांधी भवन येथे डॉ. लाखे पाटील यांनी वरील आरोप करताना, स्वीडीश शोध वृत्त माध्यम कंपनी, जर्मन सरकारी माध्यम कंपनी आणि भारतीय कॉनफ्ल्युन्स मीडियाचा हवाला दिला आहे. या कथित घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून नागपूर महापालिका, केंद्र सरकारचा भूपृष्ठ परिवहन विभाग, कोळसा मंत्रालय आणि भाजपशासित सात राज्य सरकारे यात गुंतली आहे. त्यामुळे केंद्रीय दक्षता आयोगाने या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्कॅनिया या बस कंपनीकडून नागपूर महापालिकेने मोठ्या प्रमाणावर इथेनॉलवर आधारित बसेस खरेदी केल्या होत्या. तसेच डिझेल वाहनेही खरेदी केली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

ही बातमी पण वाचा : सरकार फुकट पगार देण्यासाठी आहे का? : नितीन गडकरी

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने यासंदर्भात खुलासा करताना, सदर व्यवहाराचा आणि मंत्री महोदयांचा काहीही संबंध नाही, असे म्हटले आहे. पण त्याच खुलाशामध्ये त्यांनी या कथित घोटाळ्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे, असे काँग्रेसचे डॉ. संजय लाखे पाटील यांचा दावा आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रेही सादर केली.

नागपूर महापालिकेच्या इथेनॉलवर चालणाऱ्या ५५ बसेस अचानक स्कॅनिया कंपनीला परत दिल्या. कदाचित त्यांचे चेसीस नंबर बदलून इतरत्र खपवण्यात आल्या असण्याची दाट शक्यता आहे, असा आरोपही लाखे पाटील यांनी केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हा प्रकार धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची मागणीसुद्धा डॉ. लाखे पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, स्कॅनिया मेट्रोलिंक बस ही ट्रान्सप्रो मोटर्स या बंगळुरुस्थित एका डीलरला विकली होती, जी नंतर सुदर्शन हॉस्पिटॅलिटी नावाच्या कंपनीला विकली गेली. सुदर्शन हॉस्पिटॅलिटी नागपूरच्या बाहेर आहे. गडकरींना वैयक्तिक वापरासाठी कुठलीही बस दिली नाही, असं स्पष्टीकरण स्कॅनिया कंपनीने दिले आहे.

Scania bus company vehicle purchase scam Analysis:  स्कॅनिया बस कंपनीच्या वाहनखरेदीत घोटाळा, काँग्रेसचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER