घोटाळा : महापौर, ठाकरे सरकारविरोधात किरीट सोमय्यांची हायकोर्टात जनहित याचिका

Kirit Somaiya-CM Thackeray

मुंबई :- कोरोना (Corona) निवारण निधीत घोटाळा झाल्याच्या आरोपात भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह ठाकरे सरकार आणि महापालिकेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात (MHC) जनहित याचिका दाखल केली आहे. सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत ही  माहिती दिली आहे.

सोमय्या म्हणाले की, कोरोनाच्या रुग्णांसाठी १२ हजार कोटी रुपये खर्चून मुंबईत पाच हजार खाटांचे कोविड हॉस्पिटल बांधले. यात तीन हजार कोटींचा घोटाळा झाला. याचा लोकायुक्तांनी तपास करावा, असे निर्देशही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले आहेत, अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या घोटाळ्याबाबत महापौरांना जाब का विचारत नाहीत? त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्नही किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : किरीट सोमय्यांनी केले आरोप ; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER