कुरआनातून २६ वचने काढून काढून टाकण्यासाठीची याचिका फेटाळली

फालतू याचिका केल्याबद्दल ५० हजार रुपये दंड

नवी दिल्ली: ज्यांचा शब्दश: अर्थ लावून हिंसाचाराचे समर्थन करण्यासाठी आधार घेतला जातो अशी इस्लामच्या पवित्र कुरआनमधील २६ वचने काढून टाकावीत, अशी मागणी करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) सोमवारी फेटाळली.

उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष सैयद वासिम रिझ्वी यांच्या या याचिकेस न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने ‘तद्दन फालतू’ (Absolutely Frivolous) असे संबोधले आणि अशी थिल्लर याचिका केल्याबद्दल याचिकाकर्त्यास ५० हजार रुपये दंड केला.

याचिका सुनावणीसाठी पुकारली जाताच न्या. नरिमन यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलास विचारले, ‘तुम्ही खरंच या याचिकेविषयी आग्रही आहात? तिच्यावर सुनावणी व्हावी असे तुम्हाला खरंच वाटते? यावर रिझ्वी यांचे ज्येष्ठ वकील आर. के. रायजादा यांनी आपल्यापरीने न्यायमूर्तींना पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने खंडपीठाचे समाधान झाले नाही व शेवटी याचिकेस ‘तद्दन फालतू’ ठरवून आणि दाव्याच्या खर्चापोटी ५० हजार रुपये जमा करण्याचा आदेश देऊन ती फेटाळली गेली.

अ‍ॅड. रायजादा यांचे असे म्हणणे होते की, मूळ याचिकेत ही २६ वचने कुरआनमधून काढून टाकण्याची मागणी असली तरी मदरशांमध्ये कुरआन शिकविताना काही निर्बंध घालण्यापुरताच युक्तिवाद करण्याचा माझा विचार आहे. ते म्हणाले की, या वचनांचा शब्दश: अर्थ लावला तर ती इस्लामचे पालन न करणाºयांना वठणीवर आणण्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करण्याची शिकवण देतात, असे वाटते. त्यामुळे मदरशांमध्ये कुरआन शिकविताना ही वचने हाच अर्त सांगून शिलविली गेली तर त्याने संस्कारक्षम वयाच्या विद्यार्थ्यांची डोकी भडकतील. तसे होऊ नये यासाठी या वचनांचा खरा अंतस्थ अर्थ मदरशांमधून शिकविला जाणे गरजेचे आहे.

आम्ही यासंबंधी मदरसा बोर्डांकडे व केंद्र सरकारकडेही पत्रव्यवहार केला. पण त्यांच्याकडून काहीच सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने ही याचिका करावी लागली, असेही ते म्हणाले.

हिंसाचाराचे समर्थन करण्यासाठी सोयीस्करपणे अर्थ  लावता येऊ शकणाºया कुरआनातील या २६ वचनांची यादी देऊन याचिका म्हणते की, खरं तर इस्लाम हा न्याय, समता, क्षमाशीलता व सहिष्णुतेची शिकवणे देणारा धर्म आहे. परंतु कुरआनमधील या वचनांचा अतिरेकी अर्थ लावून दहशतवादी संघटना आपल्या राक्षसी कृत्यांचे समर्थ करतात. त्यामुळे इस्लाम धर्म त्याच्या मूल शिकवणुकीपासून भरकटत चाललाल असून अनेक लोकांसाठी त्याची ओळख हिंसाचाराचे समर्थन करणारा धर्म अशी झाली आहे.

याचिका म्हणते की, कुरआनमधील वचनांची दोन वर्गांत विभागणी केली जाऊ शकते. एक, शांतता, सलोखा, बुंधुभाव, सहिष्णुता आणि क्षमाशीलता यांची शिकवण देणारी सकारात्मक वचने. दोन, हिंसाचार व द्वेष यांचा पुरस्कार करणारी नकारात्मक वचने. कुरआन हे थेट अल्लाकडून प्रेषिताला सांगितले गेले आहे, हे सर्वमान्य असल्याने अल्लाची वचने अशी परस्परविरोधी विचारांची कशी असू शकतील, असा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. पण कुरआन हे प्रषिताच्या निर्वाणानंतर कित्येक शतकांनी खलिफांनी लिहून काढले असल्याने ही घफलत झाल्याचे जाणवते. जरी कुरआनातील या वचनांचा असा अर्थ लावला जाऊ शकत असला तरी आधुनिक काळात जगातील कोणत्याही देशाच्या प्रचलित कायद्यांशी तो मेळ खाणारा नसल्याने तो त्याज्यच मानला जायला हवा.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button