रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना ३४६ दिवसांनंतर जामीन

Ratnakar Gutte

परभणी :- तब्बल ३४६ दिवस न्यायालयीन कोठडीत घालविल्यानंतर रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधींचे कर्ज परस्पर उचलल्याप्रकरणी गुट्टे न्यायालयीन कोठडीत होते. गुट्टे यांनी २०१९मध्ये कारागृहातून गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवून विजय मिळविला होता, हे येथे उल्लेखनीय.

गुट्टे यांच्या गंगाखेड कारखान्याने एका योजनेत २०१५मध्ये ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या नावाने कर्जे उचलली होती. या रकमांची परतफेड न झाल्याने शेतकऱ्यांना वसुलीसाठी बँकांच्या नोटीस गेल्या होत्या आणि त्यानंतर हा घोटाळा उघड झाला होता. या प्रकरणी जामिनासाठी अर्ज करूनही गुट्टे यांना दिलासा मिळाला नव्हता.

या घोटाळ्यात रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबाद सीआयडीने २६ मार्च २०१९ रोजी अटक केली होती. कनिष्ठ न्यायालय, औरंगाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय, असा या प्रकरणाचा जामिनासाठी प्रवास झाला.


Web Title : SC MLA ratnakar gutte gets bail after 346 days

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)