चेक देणाऱ्याची माहिती देण्याबाबत निकष निश्चित करा – सर्वोच्च न्यायालय

RBI - Supreme Court

नवी दिल्ली : चेक न वाटण्याच्या प्रकरणात, चेक देणाऱ्याचा तपशील पोलिसांना आणि तक्रारकर्त्याला देण्याबाबत बँकेसाठी निकष निश्चित करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ला दिलेत.

सीएए हिंसाचार : चौकांमध्ये लावलेले आरोपींचे फोटो हटवा- उच्च न्यायालय

यात आरोपीचे कायमचे पत्ते, ईमेल आयडी आणि मोबाईल फोन नंबर यांचा समावेश असेल. हि माहिती चेक परत येण्याच्या ताकीदपत्रावर छापावे. न्यायाधीश एल. नागेश्वर यांनी मुख्य न्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाच्या वतीने पत्र लिहून हे सांगितले आहे.

चेक परत येण्याच्या प्रकरणात बँक महत्त्वाच्या आहेत. आवश्यक माहिती माहिती पुरवणे ही बँकांची जबाबदारी आहे. याबाबतचे खटले सहा महिन्यात निकाली निघावे असे बंधन आहे पण हे खटले दीर्घकाळ चालतात काळजी करण्याची स्थिती आहे. एका अभ्यासानुसार चेक परत येण्याचे ३. ५ दशलक्ष खटले प्रलंबित आहेत आणि ही संख्या वाढते आहे. यातील १. ८ दशलक्ष खटले आरोपीने हजर न राहिल्याने प्रलंबित आहेत.