श्रेय घेणे आमच्यासाठी महत्वाचे नसल्याचे म्हणत रोहित पवारांनी मानले मोदींचे आभार

Rohit Pawar - PM Modi - Maharastra Today
Rohit Pawar - PM Modi - Maharastra Today

मुंबई : राज्यात रेमडीसीवीरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते तसेच पंतप्रधानांना देखील पत्राद्वारे विनंती केली होती. आज केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी याकरिता पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. हा पुरवठा पूर्वी २ लाख ६९ हजार व्हायल्स एवढा होता, तो आता वाढवून ४ लाख ३५ हजार करण्यात आला आहे. आता यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. मात्र कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी श्रेय घेणे महत्वाचे नसल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले (Rohit Pawar thanked Modi) आहेत.

राज्याला २२ एप्रिल रोजी दिलेला रेमडीसिवीरचा २.६९ लाखाचा अन्यायकारक कोटा दुरुस्त करत त्यात वाढ करून ४.३५ लाख केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार. महाविकास आघाडी सरकारने वाढीव कोट्याची मागणी केली तेंव्हा राज्यातील विरोधकांनी या मागणीला नेहमीप्रमाणे राजकारण म्हणत बगल देण्याचा प्रयत्न केला. पण हेच विरोधक केंद्राकडून आज वाढीव कोटा मिळताच श्रेय घेण्यासाठी आघाडीवर आहेत. असो! श्रेय कोणीही घेवो आमच्यासाठी ते महत्वाचं नाही तर राज्याला पुरेशी औषधं मिळणं अधिक महत्त्वाचं आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button