मुख्यमंत्र्यांना कोणी काही बोलणं हा महाराष्ट्राच्या मातीचा अपमान- जितेंद्र आव्हाड

Jitendra Awhad - CM Uddhav Thackeray

मुंबई : पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सूचनेनुसार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भवनमध्ये जनता दरबार घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने केलेल्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया दिली. ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कोणी काही बोलणं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीचा अपमान आहे’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहेत.

अशा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणं हे माझ्यासारख्या मराठी मातीवर प्रेम करणाऱ्याला कदापि सहन होणार नाही. टोकाचे मतभेद असू शकतात. रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. यामुळे मराठी मातीचा अपमान झाल्याचं आव्हाड म्हणाले. यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर या दोघांचा निषेध करण्यात आल्याचं आव्हाडांनी सांगितलं. मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांच्या नावांचा एकेरी उल्लेख करणे चुकीचे आहे. वडीलधाऱ्यांबद्दल आपण नेहमी आदरपूर्वक बोलत असतो. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे.

उत्तरप्रदेशमध्ये ‘आप’शिवाय बोलत नाही. वडीलधाऱ्यांचा सन्मान करणं ही भारतीय संस्कृती आहे, असं आव्हाडांनी नमूद केलं. दरम्यान, मुंबईत (Mumbai) स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. पवारसाहेबांच्या सूचनेनुसार, दर सोमवारी दुपारी २ ते ४ या वेळेत मी मायबाप जनतेला भेटण्यासाठी, पक्षाच्या बेलार्ड इस्टेट, फोर्ट येथील कार्यालयात थेट उपलब्ध असतो. आजचा दुसरा सोमवार आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न थेट सोडवता येतात, यासारखे दुसरे समाधान नाही, असेही आव्हाड म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुंबईसह महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER