संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा… ; शरद पवारांनी मांडले नामांतरावर परखड मत

Sharad Pawar - NCP

मुंबई :- औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतरावरुन महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसमध्ये (Congress) एकमत नसून सध्या आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. नामांतराच्या विषयावरुन सुरु असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

शरद पवार यांनी सांगितलं की, “आमच्यात वाद नाहीत. संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा, नाहीतर अजून काही म्हणा..या प्रकरणाकडे मी गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे मी कधीही भाष्य केलं नाही, असे वक्तव्य पवार यांनी केले .

दरम्यान मुख्यमंत्री कार्यालायच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा ‘संभाजीनगर’ (Sambhaji Nagar) असा उल्लेख करण्यात आल्यानंतर नामांतराचा हा वाद नव्याने निर्माण झाला होता. त्यातच आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आला आहे. काँग्रेस नामांतराला विरोध करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मात्र आपण वर्षानुवर्ष ही मागणी करत असल्याचं सांगत भूमिकेवर ठाम असल्याचं दाखवलं आहे. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आमची भूमिका मुख्यमंत्र्यांना निश्चित पटवून देऊ असे म्हटले होते.

ही बातमी पण वाचा : औरंगाबाद महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता! आदित्य ठाकरेंच्या  दौऱ्यावरुन काँग्रेस पदाधिकारी नाराज

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER