कनेक्शन तोडू नका सांगितले, तोडलेले जोडा असे नाही; महावितरण अधिकाऱ्याचे उत्तर

MSEDCL Worker

लातूर : विधिमंडळात चर्चेत असलेल्या वीज बिलाबाबत निर्णय होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्याचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर केले.

यामुळे शेतकऱ्यांना वाटले तोडलेली वीज जोडणी होईल. वीज पुरवठा तोडलेले शेतकरी लातूर (Latur) जिल्ह्यातील किल्लारी इथल्या महावितरणच्या (MSEDCL) कार्यालयात गेले आणि अजित पवारांच्या घोषणेचा हवाला देऊन वीज पुरवठा पूर्ववत करा, अशी त्यांची मागणी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले, आम्ही वीज जोडणी करू शकत नाही. कनेक्शन तोडू नका, असे सांगितले आहे, तोडलेले जोडा असे आदेशात कुठेही म्हटलेले नाही. वीज बिलांबाबतचा निर्णय होईपर्यंत नवीन कनेक्शनही देणार नाही! सध्या अधिवेशन सुरू आहे.

अधिवेशनात याबाबत प्रश्न विचारला जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER