शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर सावकरीचा गुन्हा

commits suicide

बेळगाव : खासगी सावकारीला कंटाळून तरुणाने गळफास घेउन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. 6) सकाळी बापट गल्लीत ही घटना घडली होती. विजय मनोहर गवाणे (वय 35, रा. बापट गल्ली) असे मयताचे नाव आहे. दहा टक्‍के व्याजाने पैसे देउन वसुलीसाठी छळवणूक केल्याप्रकरणी बेळगाव जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू उर्फ परशराम केरवाडकर (रा. वडगाव) याच्याविरोधात पोलिसांनी खासगी सावकारी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, विजय हा बापट गल्ली येथील सुरेखा ऑफसेट्‌स आणि ग्राफीक दुकानात कामाला होता. त्याने सन 2015 मध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले होते. दहा टक्‍के व्याजाने घेतलेले पैसे व्याजासाठी विजयकडे वारंवार जात होता. लॉकडाउन व इतर कारणामुळे त्याने हप्ता भरला नव्हता. त्यामुळे बंडूने त्याच्याकडे पैशासाठी तगादा लावला होता.

आज सकाळी आठच्या सुमारास बंडूने विजयच्या घरी जाउन त्याला आरडाओरड केली होती. तसेच अधिक पैसे देण्यासाठी त्याने त्याला दम दिला होता. सततच्या छववणुकीला कंटाळून त्याने आज सकाळी कामाच्या ठिकाणी गळफास घेउन आत्महत्या केली.सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देउन पाहणी केली. त्यानंतर मयताच्या कुंटुबीयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खासगी सवकारी करणाऱ्या केरवाडकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER