सावित्रीमाई फुले आणि मुलगा यशवंत यांनी प्लेगग्रस्तांची सेवा करत गमावले होते प्राण

Savitrimai Phule and her son Yashwant lost their lives while serving the plague victims.

देशभरात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. मागच्या वर्षी कोरोनामुळं (Corona) परिस्थीती हाताबाहेर गेल्याचं चित्र निर्माण झाल्यामुळं लॉकडाऊनही करावं लागलं होतं. राज्यातल्या प्रमुख शहरांपैकी काही भागात अंशता लॉकडाऊन घोषित करण्यात आलंय. पण भारतात महामारी पसरण्याची ही काही पहिली वेळ नाहीय

प्लेगनं भारतात शेकडो वर्षापूर्वी असंच थैमान घातलं होतं. प्लेगला ‘ब्लॅक डेथ’ (Black Death) म्हणूनही ओळखलं जातं. जगभरातील देशात प्लेगनं थैमान घातलं होतं. अनेक देशांना न या रोगाबद्दल काही माहिती होतं न याचा काही इलाज होता. १८९६ ते ९७ मध्ये प्लेगनं भारताला कवेत घेतलं. प्रचंड हाहाकार माजला होता.

दर आठवड्याला १९०० लोकांचा जीव या महामारीमुळं गेला. वैद्यकीय तज्ञ रात्रंदिवस या रोगावर उपाय शोधण्यात व्यग्र होते. तर काही जणांनी स्वतःला या कार्यात झोकून दिलं होतं. रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांनी मृत्यूचीही पर्वा केली नाही. आणि रुग्णांची सेवा करता करताच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. समाजाप्रतिच्या समर्पणाची सर्व आयामं त्यांनी ओलांडली होती. यातली दोन नावं होतं सावित्रीबाई फुले आणि यशवंतराव फुले.

सावित्रीमाई मुंडव्यातल्या महार वस्तीतल्या दहा वर्षाच्या चिमुकल्याला स्वतःच्या मुलाच्या दवाखान्यात घेवून आल्या. चिमुकल्याचा जीव वाचण्यात तर त्या यशस्वी झाल्या पण त्यांना प्लेगची लागण झाली. त्यामुळं १० मार्च १९९७ ला वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला.

जातीवाद, प्लेग आणि फुले परिवार

भारतीय इतिहासात सावित्रीमाईंच (Savitrimai Phule) नाव अनेक सामाजिक सुधारणेच्या आंदोलनाशी जोडलं गेलंय. त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत त्यांनी भारतीय समाजातील महिलांच्या अधिकारांसाठी लढाई लढली. एक प्रसिद्ध लेखिका आणि शिक्षण चळवळी महिला आणि दलितांना स्थान देणाऱ्या क्रांतीअग्रणी म्हणून इतिहासात त्यांची नोंद आहे. या सर्व प्रक्रियेत त्यांनी मानवता धर्माला सर्व जातीपातींच्या पल्याड ठेवलं.

१९७३ला ज्योतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाचा पाया रचला. सावित्रीमाईंनी त्यात सामान्य कार्यकर्त्याच्या रुपात काम करायला सुरुवात केली. आणि भरीव योगदान ही चळवळीला दिलं.

भारतात प्लेग फोफावयला लागला पण भारतीय समाज जातीवादाच्या साखळीत बांधला गेला होता. त्यावेळी ब्रिटीशांच शासन होतं. सरकारनं जातपात न बघता सर्व रुग्णांना डॉक्टरांनी उपचार द्यावेत असे फर्मान काढले होते. पण प्रत्यक्षात डॉक्टरांकडून तशी कृती मात्र होत नव्हती.

रोग्यांशी होणारा भेदभाव सावित्रीमाईंना पहावला नाही. त्यांनी ब्राम्हण डॉक्टरांकडून प्रशिक्षण घेतलं आणि स्वतः प्लेगग्रस्त रुग्णांची सेवा करायला सुरुवात केली. ब्राम्हण डॉक्टर शुद्रांची सेवा करायला तयार नव्हते.

सावित्रीमाईंना त्यावेळच्या सामाजिक परिस्थीतीचं भान होतं. त्यांच्या दत्तक पुत्राला त्यांनी प्लेगग्रस्तांच्या सेवेसाठी रुग्णायल सुरु करण्यासाठी सांगितलं. ज्याच्यामुळं रोग्यांना उपचार मिळतील. ज्यांचा जातीमुळं त्यांना उपचारांपासून इतर डॉक्टर वंचित ठेवतायेत. सावित्रीमाई रुग्णांची सेवा करता करता कळाच्या पडद्या आड गेल्या.

त्यांचे पुत्र यशवंतराव फुले प्लेगपासून त्यावेळी वाचले. त्यांनी निरंतर सेवा सुरु ठेवली. पुढं सेवा देण्यासाठी ते सैनदलात गेले. १९०५ ला परतले कारण प्लेगनं पुन्हा डोकं वर काढलं होतं. रुग्णांवर ते ही दिवस रात्र उपचार करत राहिले आणि शेवटी १३ ऑक्टोबर १९०५ ला त्यांचा मृत्यू झाला.

शुद्र आणि दलितांना ज्यावेळी उपचार नाकारले जायचे तेव्हा सावित्रीमाई आणि त्यांच्या चिरंजीवांनी रुग्णांची सेवा केली. कठिण समयी त्यांनी केलेला त्याग आणि गरजवंतांचा जीव वाचवण्यासाठी सेवाभावी समर्पक वृत्तीनं अनेकांना मरणाच्या दाढेतून बाहेर काढलं. सावित्रीमाई फुले आणि यशवंतरावांची त्याग आणि सेवाभावीवृत्ती आजही अनेकांना लढण्यासाठी बळ आणि सेवेसाठी सामर्थ्य देते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER