सावित्रीबाई फुले विद्यापीठात स्थापन होणार ‘मराठा साम्राज्य’ अभ्यास व संशोधन केंद्र

Savitribai Phule University

पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठात (Savitribai Phule University) ‘मराठा साम्राज्य’ अभ्यास व संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यासह इतर मराठा राजांच्या राज्यांचा अभ्यास करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू नितीन करमळकर (Nitin Karmalkar) यांनी दिली.

गुरुवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन कौन्सिलच्या बैठकीत मी हा प्रस्ताव मांडला. तो एकमताने मान्य करण्यात आला. मराठा राजांच्या इतिहासाबद्दल मोडी लिपीतील हजारो कागदपत्रांचा अजून अभ्यास झालेला नाही. या केंद्रामुळे या कागदपत्रांचा अभ्यास होईल, असे करमळकर म्हणालेत.

अकॅडेमिक कौन्सिलचे सदस्य व इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे याबाबत म्हणाले – दोनशे वर्षांपेक्षा जास्त काळाच्या मराठा साम्राज्याच्या काळात शिवाजी महाराजांच्या नंतरही मराठा राजे झाले आहेत. या राजांच्या माहितीचे मोडी लिपीतील पाच कोटी कागदपत्रे उपलब्ध आहेत. यामुळे असे अभ्यास केंद्र सुरू करणे ही महत्त्वाची घटना आहे. यानंतर इतरही विद्यापीठात असे अभ्यास केंद्र सुरू होतील, अशी आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER