नानाभाऊंच्या भूमिकेमुळे सावरकरप्रेमी सुखावले पण…

Savarkar lovers are happy because of Nanabhau's role but ...

मुंबई -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शुक्रवारी एका नामवंत दैनिकात एक मुलाखत दिली आणि त्यावरून वादळ निर्माण झाले. सावरकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा विरोध नाही. सावरकरांना भारतरत्न किताब देण्याचा ठराव शिवसेनेने विधिमंडळात आणला तर जनभावना त्या बाजूने असेल तर काँग्रेसचा पाठिंबा राहील असे पटोले म्हणाले. औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याच्या मागणीबाबतही काँग्रेसची हीच भूमिका राहील’ असे नानाभाऊ त्या मुलाखतीत म्हणाले. यावरून लगेच चॅनेल्सवरून बातम्या सुरू झाल्या. पटोले यांना अडचणीत आणण्याची संधी शोधली जावू लागली.तसेही मुंबईचा मीडिया विदर्भातील नेत्यांना अनेकदा टार्गेट करीत आला आहे. दादासाहेब कन्नमवारांपासून अनेकांची उदाहरणे या बाबत देता येतील. नानाभाऊंच्या भूमिकेमुळे सावरकरप्रेमी निश्चितच सुखावले असतील.

काँग्रेसच्या (Congress) अनेक नेत्यांनी आजवर अशी थिअरी मांडली आहे की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा गोडसे हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा निकटवर्ती होता व त्यांच्या हिंदू महासभेचा कार्यकर्ता होता. ही थिअरी मांडत नेहमीच सावरकर यांना देशद्रोही ठरविले जाते. त्यांनी अंदमानच्या जेलमधून सुटका व्हावी यासाठी ब्रिटिश राजवटीकडे माफीनामा लिहून दिला होता असा दावा काँग्रेसने अनेकदा जाहीरपणे केला आहे. मात्र, त्याचवेळी जाज्वल्य राष्ट्राभिमानाचे प्रतीक म्हणून सावरकरांना मानणारा देशात आजही मोठा वर्ग आहे. एकीकडे काँग्रेसची सावरकरांबाबत पूर्वापार चालत आलेली भूमिका अशी असली तरी सावरकर यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा विरोध नाही असे विधान पटोले यांनी केल्याने खळबळ माजणे साहजिकच होते.

पटोले हे स्पष्टवक्ते आहेत. पदाची चिंता न करता, आपल्या भूमिकेची किंमत मोजण्याची त्यांची नेहमीच तयारी असते. भाजपमध्ये असताना त्यांनी हे सिद्ध केले. त्यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते तेव्हाही आपले सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याची टीका करीत त्यांनी काँग्रेस सोडली होती व नंतर ते भाजपमध्ये गेले होते. नाना पटोले यांची सावरकरांबाबतची भूमिका काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कितपत मान्य आहे? अर्थातच ती मान्य नसावी, कारण पटोलेंच्या विधानाशी सहमती दर्शविणारे विधान काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने केलेले नाही.

पटोले यांची मुलाखत छापून आली आणि वातावरण ढवळून निघाले. काही तासानंतर स्वत: पटोले यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा विरोध नाही असे विधान आपण केलेच नव्हते असा खुलासा केला. एवढेच नव्हे तर सदर वृत्तपत्राने आपली माफी मागितली नाही तर आपण त्या वृत्तपत्राविरुद्ध विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणू असा इशारा त्यांनी दिला. शनिवारी त्या वृत्तपत्राने पटोले यांचा खुलासा ठळकपणे प्रसिद्ध केला. सावरकरांच्या भारतरत्नबाबत आपण तसे विधान केले नव्हते असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता या विषयावर पडदा पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER