सौरव गांगुली क्वारंटाईन

स्नेहाशीष गांगुली पॉसिटीव्ह

Saurav Ganguly Home Quarantine

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांचे ज्येष्ठ बंधू स्नेहाशिष गांगुली हे कोरोना (Corona) पॉसिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सौरव गांगुली यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. स्नेहाशिष हे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनासुध्दा होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यालय मुंबईला आहे पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सौरव गांगुली हे कोलकात्यातील आपल्या घराजवळच्याच एका कार्यालयातून बीसीसीआयचे काम बघत आहेत.

स्नेहाशिष यांच्यासंदर्भात बंगाल क्रिकेट असो. कडून जारी वक्तव्यात म्हटले आहे की, ते स्वतःहूनच काल सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांना बारीक ताप असल्याशिवाय इतर कोणतीही तक्रार नाही. ते सध्या ठिकठाक आहेत. नियमानुसार ते पुढील काही दिवस होम क्वारंटाईन राहणार आहेत.

सौरव गांगुली व अभिषेक दालमिया यांच्यात लक्षणे दिसत नसल्याने त्यांची लगेच चाचणी केली जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र पुढील सुचनेपर्यंत बंगाल क्रिकेट असोसिएशनची कार्यालये बंद राहणार आहेत.

या असोसिएशनच्या स्थापत्य विभागात कार्यरत चंदन दास नावाचा कर्मचारी पॉसिटीव्ह आढळल्यापासून म्हणजे 4 जुलैपासून ही कार्यालये बंदच आहेत.

20 जून रोजी स्नेहाशीष यांच्या आई, सासू, सासरे आणि घरकाम करणारे पॉसिटीव्ह आढळले होते. त्यानंतर मोमीनपूर येथील घरातून स्नेहाशिष हे चांदी भवन येथे सौरव गांगुलींकडे आले होते. सौरव यांनी 8 जुलै रोजी आपला वाढदिवस सर्व कुटुंबियांसोबत साजरा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER