सौरव गांगुलींना दवाखान्यातून सुटी

माजी कर्णधार व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguly) यांना गुरुवारी दवाखान्यातून सुटी मिळाली आहे. ४८ वर्षांच्या गांगुली यांना हृदयविकाराच्या त्रासामुळे गेल्या शनिवारी कोलकात्यातील वूडलँडस् (Woodlands Hospital) दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांना बुधवारीच सुटी मिळणार होती; पण सौरव यांनी आणखी एक दिवस जादा दवाखान्यातच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता.

आपण व्यवस्थित आहोत असे सौरव यांनी  सुटी मिळाल्यावर म्हटले आहे. आपल्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स व सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी  धन्यवाद दिले आहेत. तर त्यांच्या प्रकृतीवर येते काही दिवस लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे दवाखान्यातर्फे सांगण्यात आले आहे. सौरववर गेल्या शनिवारीच अँजिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली होती आणि  पुढील उपचार काय असावेत हे ठरविण्यासाठी डॉक्टरांच्या नऊ सदस्यांच्या पथकाची सोमवारी बैठक झाली होती.

त्यांनी अनुभवी हृदयरोगतज्ज्ञ डॉ. देवी शेटूटी यांच्याशी सल्लामसलत करून सौरवला सुटी देण्याचा निर्णय घेतला होता. पुढील अँजिओप्लास्टी या सौरव गांगुली यांच्या योयीनुसार करण्यात येणार आहेत. आपण दवाखान्यात नवजीवनासाठी येतो असे म्हणतात आणि ते खरेच आहे. मी अगदी व्यवस्थित आहे आणि लवकरच मी प्रवाससुद्धा करू शकेल, अशी आशा असल्याचे सौरवने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER