कॉंग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतले ताब्यात

Satvasheela prithviraj chavan

कराड : कॉंग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करताना पोलिसांनी कारवाई केली आहे. सत्त्वशीला चव्हाण (Satvasheela prithviraj chavan) यांना पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ताब्यात घेतलं. सत्त्वशीला चव्हाण यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन केले. केंद्र सरकारला चव्हाण यांनी जळजळीत प्रश्न केलेत.

“शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी, अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?” असा प्रश्न चव्हाण यांनी केला. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनांच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी अशा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारचा निषेध नोंदवला.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाजवळ कोरेगाव-सातारा मार्ग काही काळासाठी रोखून धरला होता. तर काही आंदोलकांनी या महामार्गावरच चूल मांडून भाकऱ्या थापल्या. त्यानंतर काही वेळासाठी या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलनानंतर पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER