औरंगाबादेतील ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकवण्यासाठी सत्तारांनी कंबर कसली

Abdul Sattar

औरंगाबाद : लवकरच राज्यात 34 जिल्ह्यांमधील 14 हजार 234 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यात 15 जानेवारी 2021 रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, ग्राम पंचायत निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी कंबर कसली आहे. खेडोपाड्यांमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फारसा प्रभाव नसलेल्या शिवसेनेनेही (Shiv Sena) ग्राम पंचायत निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. औरंगाबादमधील ग्रामपंचायंतींवर भगवा फडकवण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी कंबर कसली आहे. त्यांनी सध्या गावागावात बैठका घेण्याचा सपाटा लावला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील 618 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी ग्रामपंचायतींच्या राजकारणात उडी घेतली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारांच्या अनेक गावांमध्ये बैठका सुरू आहेत. जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये त्यांचा संपर्क दौरा सुरु असून यादरम्यान यादाव्र विविध गावांमधील कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद सुरु आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER