
जळगाव :- राज्यातील मुदत संपणाऱ्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. त्यातच राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी थेट भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना खुलं आव्हान दिलं आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असा पण त्यांनी केला आहे. सत्तारांच्या या टीकेला भाजपचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
ही बातमी पण वाचा:- दानवेंना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही’, अब्दुल सत्तारांचा पण
‘अब्दुल सत्तार हे युतीतून निवडून आले आहेत. याचं त्यांनी भान ठेवावं. रावसाहेब दानवे यांचं काम मोठं आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केलं आहे. अनेक वर्षांपासून ते निवडून येत आहेत. त्यांना पराभूत करणं तेवढं सोप नाही. त्यामुळे सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, आणखी टोप्या लागत असतील तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असा चिमटा महाजन यांनी काढला. महाजनांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीतून त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला