समसमान जागेसाठी आग्रही असणारी शिवसेना भाजपसमोर नरमली… ”जे वाट्याला येईल त्यात समाधानी” – अनिल देसाई

मुंबई : युतीबाबत नवीन फॉर्म्युला आला आहे. तुम्ही आकडेवारीत जाऊ नका, जे शिवसेनेच्या वाट्याला येईल ते घेऊन लढायची आमची तयारी आहे. ठरलेल्या फॉर्मुल्यावर शिवसेना पक्षप्रमुख समाधीनी असल्याशिवाय कोही होणार नाही असं शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी सांगीतले.

युतीबाबत शक्य अशक्यता पेरल्या जात असताना शिवसेना भाजपचे कर्यकर्ते संभ्रमात होते. अखेर काल गुरूवारी 19 सप्टोेबर रोजी युतीचा फॉर्म्युला ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुभाष देसाई यांच्या मॅराथॉन बैठकीत जगावाटपाचा फॉर्मुला ठरला. शिवसेना 126 तर भाजपा 162 जागांवर निवडणुका लढणार असे निश्चित करण्यात आले.

तसेच येत्या 22 सप्टेंबर पर्यंत युतीची घोषणा होणार असे त्यांनी सांगीतले. जागावाटपाचा फॉर्मुला निश्चीत झाल्यानंतर शिवसेनेच्या 50 – 50 च्या आग्रहावर चर्चा होताना दिसत आहे. यापुर्वी शिवसेनेने 50 50 समसमान जागेचा आग्रह धरला होता. तसे भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत हा 50 50 चा फॉर्मुला ठरल्याचे सांगण्यात येते. परंतू ऐनवेळी भजप ने समसमान जागा न देता अधिकच्या जागा त्यांनी आपल्याकडे राखून घेतल्यात यामुळे हा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही समसमान जागांचा प्रस्ताव अनेकदा बोलून दाखवला होता, शिवाय समसमान जागा देऊन भाजपने शिवेसनेचा मान राखआवा असेही तो बोलले होते. अखेरीस मात्र आता ठरलेल्या फॉर्मुल्यावर शिवसेना समाधानी असल्याचे खूद्द देसाई यांनी स्पष्ट केले आहे.