दीपकने १७० जणांचे प्राण वाचवले याचे आहे समाधान – नीला साठे

Nila Sathe

मुंबई : आमच्या मुलाने संकटाच्या काळात हिम्मत दाखवत एवढ्या प्रवाशांचे प्राण वाचवले. याचे समाधान वाटते, असे कॅप्टन दीपक साठे (Deepak Sathe) यांच्या आई नीला साठे (८३) म्हणाल्या. दीपक यांच्याबद्दल त्या पुढे म्हणाल्या – माझा मुलगा लहानपणापासून हुशार होता. प्रत्येक बाबतीत त्याने गुणवत्ता दाखविली. आज तो गेला.

दीपक साठे यांचे आई- वडील सध्या नागपुरात (Nagpur) नातेवाईकांकडे राहतात. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या- दीपकने समयसूचकता दाखवत १७० प्रवाशांचे प्राण वाचवले याचे समाधान आहे. दीपक यांचे वडील वसंत (८७) कर्नल होते. ते म्हणाले मला मुलाचा अभिमान आहे.

दीपक खूप हुशार होते. शैक्षणिक आयुष्यानंतर एनडीए मध्ये प्रशिक्षण घेताना, त्यानंतर भारतीय हवाई दलात सेवा देताना त्यांनी अनेक पुरस्कार आणि मेडल्स मिळवलेत.

दीपक यांचे चुलत भाऊ निलेश यांनी म्हटले आहे की, एअरफोर्समध्ये असताना नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दीपक हवाई दुर्घटनेत बचावले. सहा महिने रुग्णालयात होते. ते पुन्हा उडाण करू शकतील असे कोणालाही वाटत नव्हते. पण त्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती आणि मित्रांच्या प्रेमामुळे पुन्हा मैदानात उतरले. हा एक चमत्कार होता.

सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजचे संचालक एअर वायस मार्शल मनमोहन बहादुर यांनी साठे यांच्याविषयी ट्वीट केले – दीपक माझ्यासोबत टेस्ट पायलट म्हणून होते. ते अनुभवी पायलट होते. “RIP Tester”. दीपक यांची आई नीला यांचा आज वाढदिवस आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER