आमदारकीचा जल्लोष न करता समाधान आवताडे कोरोनाविरोधातील लढ्यात

BJP - Samadhan Autade

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) अगदी मनावर घेतलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांचा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला. पण या विजयानंतर आमदार समाधान आवताडे (Samadhan Awatade) यांनी कोणताही जल्लोष साजरा न करत थेत कोरोनाविरोधातील (Corona) लढ्यात उतरल्याचे आज बघायला मिळाले. पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे समाधान आवताडे हे आमदार झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी थेट कोरोनाविरोधातील लढाईत उतरले आहेत.

आवताडे यांनी आज तातडीने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या दालनात अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदारसंघातील कोरोना स्थितीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकही उपस्थित होते. त्याचबरोबर कोरोना लस आणि रेमडेसिवीर इंजेक्शनबाबतही माहिती घेतली. त्यानंतर आमदार आवताडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत आरोग्य यंत्रणेला गती देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उजनी धरणातील ५ टीएमसी पाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही आवताडे यांनी यावेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button