फडणवीस यांच्याबद्दल कोल्हापूरकरांत समाधान : गरीबाच्या प्रश्न केला उपस्थित

Devendra Fadnavis

कोल्हापूर :- कागल तालुक्‍यातील नानीबाई चिखली येथील जनाबाई मगर यांना महावितरणने पाठविलेल्या बिलासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांचे महापुरात घर पडले असताना व वीज मीटर बंद असताना बिल पाठवले जातेच कसे, अशी विचारणा केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेली तळमळ आणि उपस्थित केलेल्या गरीबाच्या प्रश्नाबाबत कोल्हापूरकरांत (Kolhapur) समाधान व्यक्त होत आहे.

वाढीव बिलासंदर्भात राज्यातील वीज ग्राहकांत असंतोष आहे. कोरोना (Corona) काळातील वीज बिले माफ करावीत, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आंदोलने, निदर्शने होत आहेत. यासंदर्भात फडणवीस यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना नानीबाई चिखली येथील जनाबाई मगर यांचे घर महापुरात पडले असताना व वीज मीटर बंद असताना त्यांना बिल पाठविल्याचा विषय फडणवीस यांनी उपस्थित केला. त्यावर पटोले यांनी अव्हरेज बिल देण्याची पद्धत बंद व्हायला हवी. अन्यथा हा विषय सातत्याने चर्चेत येईल, असे स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : सरकारचे सल्लागार कोण हे समजत नाही, सगळं बुडवायला निघाले- फडणवीस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER