सतेज पाटील यांचा शब्द अंतिम : नूतन आमदार आसगवकर

Satej Patil

कोल्हापूर : विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. त्यांच्यामुळेच आपल्याला मताधिक्य मिळाले आहे. त्यांचा कोणताही शब्द पडू देणार नाही अशी कामगिरी करू अशी ग्वाही नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिली.

विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे आज दुपारी कोल्हापुरात आगमन झाले. ते पुण्यातून आल्यानंतर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा संपर्क कार्यालयात येऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी नूतन आमदार आसगावकर यांचा बुके देऊन सत्कार केला. यावेळी त्यांनी नूतन आमदार आसगावकर यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलतांना नूतन आमदार यांनी विधान परिषदेच्या शिक्षक मदतदार संघात आपल्याला पालकमंत्री सतेज पाटील यांनी संधी दिली.

त्यांच्या सहकार्यामुळे मला या निवडणुकीत मताधिक्य मिळवता आहे. त्यामुळे यांचा कोणताही शब्द खाली पडू देणार नाही अशी कामगिरी करू असे म्हटले यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांनीही नूतन आमदार प्रा. जयंत आसगावकर यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी महापौर निलोफर आजरेकर, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगुले, शिक्षक नेते भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, दादा लाड, समीर घोरपडे, आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER