ना. सतेज पाटील यांची ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ मोहीम

Nail Free Tree Kolhapur - Satej Patil

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या संकल्पनेतून आणि स्वयंसेवी संघटनांच्या सहभागाने शहरात ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ ही मोहीम राबवली जाणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून ही मोहीम कोल्हापूर शहरात सुरू होत आहे. यासाठी 50 पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्था सहभागी होणार आहेत, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

मागील दिवसांपासून शहरातील वृक्षप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था झाडे खिळेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, एकाच वेळी सर्वच स्वयंसेवी संस्थांसह वृक्षप्रेमी संस्थांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकत्र करून कोल्हापूर शहरातील सर्वच झाडे खिळेमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

याबाबत शहरातील सर्वच स्वयंसेवी संस्थांची आज शनिवारी ना. पाटील यांच्या अजिंक्यतारा या कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. कोल्हापुरातील अनेक झाडांवर विविध कंपन्यांनी, काही संस्थांनी, दुकानदारांनी आपल्या जाहिरातीसाठी खिळे ठोकून होर्डिंग लावले आहेत. आशा झाडांची संख्या या मोहिमेच्या माध्यमातून काढण्यात आली असून येत्या 3 जानेवारीला सर्वच झाडे खिळेमुक्त करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. ‘खिळेमुक्त झाडांचे कोल्हापूर’ या मोहिमेत शहरातील सर्वच स्वयंसेवी संस्था येत्या 3 जानेवारी रोजी एकत्र येणार आहेत. त्यामुळे या उपक्रमात शहरातील नागरिकांनाही सहभागी व्हायचे असेल तर यांनी सुद्धा आपल्या परिसरात स्वयंसेवी संस्थेसोबत योगदान द्यावे, असे आवाहनही ना. पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER