सतेज पाटलांचा हम करे सो कायदा : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil-Satej Patil

कोल्हापूर : कोरोना संकटात लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळे यांना सोबत घेऊन काम झाले नसल्याने कोल्हापुरात संकट वाढले आहे. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हा प्रशासनाचे ‘हम करे सो कायदा’ आता परवडणार नाही, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

आ. पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासनाने सुरुवातीला खूप चांगले काम केले; मात्र कोरोना उद्रेकाचा अंदाज घेता आला नाही. आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेतल्या नाहीत. अंदाज घेऊन तालीम संस्था, मंडळे, जनता, लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन नियोजन केले असते, तर आता संकटाची तीव्रता कमी झाली असती.

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती नाही. मी विविध माध्यमातून कोल्हापूरसह राज्यातील जनतेशी संवाद साधत होतो, हे त्यांना माहिती नाही. नगरचे पालकमंत्री असूनही ते कागलमध्येच काम करीत आहेत. नगरमध्ये स्थिती गंभीर आहे. तेथे त्यांनी ठाण मांडून काम केले पाहिजे, असा टोला आ. पाटील यांनी मुश्रीफ यांना लगावला. आम्ही लोकांना मदत केली. तुम्हीही करा मात्र तुमची दानत हवी ना, असा टोला त्यांनी मुश्रीफ यांना लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला