सतेज पाटलांनी कामकाज बदलावे अन्यथा : शिवसेना माजी आमदारांचा इशार

Rajesh Kshirsagar & satej Patil

कोल्हापूर : महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते म्हणून सतेत पाटील (Satej Patil) यांनी स्वत: निर्णय घेतले पाहिजेत. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम्हाला धोका दिला. आम्ही बेसावध होतो. भविष्यात त्यांनी आपले कामकाज सुधारावं, नाहीतर राजकीय चक्र कायम सुरू आहे. दुसऱ्यावर आरोप करू नका. गेली दीड वर्ष झाले मी काहीही बोलेलो नाही. मी सर्वसामान्यांचा नेता आहे. माझ्या मागे कोणीही नाही; म्हणून माझ्यावर काहीही खापर फोडू नका, असा इशारा शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी आज पालकमंत्री सतेज पाटील यांना पत्रकार परिषदेत दिला.

कोल्हापूर महानगरपालिकेसंदर्भात पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसबा बावड्यात फिक्सिंग भाषणाचा मेळावा घेतला. फिक्सिंग भाषणात महापालिकेमध्ये सेना वेगळी लढेल, असे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर म्हणाल्याचे पाटील यांनी सांगितले. वास्तविक, पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली कार्यपद्धती बदलावी नाहीतर, त्यांच्यावर 2014 सारखी वेळ यायला वेळ लागणार नाही, असे सूचक वक्त्यव्य क्षीरसागर यांनी केले.

क्षीरसागर पुढे म्हणाले, महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसने केली. त्यानंतर काँग्रेसने केली. मग शिवसेना म्हणून आम्ही कुठेही कमी नाही. यासाठी तिसऱ्यावेळेला आम्ही वेगळे लढू शकतो, असे म्हटले होते. शिवसेना आज शहरात कमजोर आहे. त्यांना कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत जास्त जागा द्यायला लागू नये. राष्ट्रवादीलाही त्याच पद्धतीने टेकओव्हर करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना जास्तीत-जास्त काँग्रेसच्या जागा निवडून आणायच्या आहेत. वास्तविक, 2014 मध्ये विधानसभेला सतेज पाटील यांचा पराभव झाला. विधान परिषदेमध्ये सर्वांनी त्यांना मदत केली. शिवसेनेचे बोट धरून ते विधान भवनात गेले. 2014 मध्ये महादेवराव महाडिक व अमल महाडिक हे आमदार होते. धनंजय महाडिक हे खासदार होते. शौमिका महाडिक या जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या. त्यावेळी सतेज पाटील काहीही नव्हते. आज सतेज पाटील मंत्री आहेत. त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील आमदार आहेत; म्हणजे राजकीय परिस्थिती कधीही आहे तशी राहत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसलाही ते हळूहळू टेकओव्हर करत आहेत. हे त्यांच्याही लक्षात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते सावध झाले आहेत, असा गौप्यस्फोटही माजी आमदार क्षीरसागर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER