सतेज पाटील यांनी केले साताऱ्यात काका बाबा यांचे मनोमिलन

Satej Patil

सातारा : साताऱ्याचे काँग्रेसचे संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या प्रयत्नातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी आमदार उंडाळकर या कराडमधील काका-बाबा गटाचे एकत्रीकरण झाले. राज्याच्या राजकारणात या घटनेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्यास सहप्रभारी सोनल पटेल, मंत्री विश्वजित कदम, सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अध्यक्ष मनोहर शिंदे, रयत संघटनेचे प्रा. धनाजी काटकर, इंद्रजीत मोहिते, मोहन जोशी यासह जिल्ह्यातील व कराड तालुक्यातील कॉंग्रेसजण उपस्थित होते.

राज्याचे महसूलमंत्री व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत कऱ्हाडातील काल, शुक्रवारी कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सातारा जिल्ह्यातील हे दोन दिग्गज नेते वैरत्व विसरून एकत्र आले, या मेळाव्याप्रसंगी मार्गदर्शन करताना चव्हाण म्हणाले, काका व आमच्यामध्ये मनभेद नव्हते मतभेद होते. ते विसरून ॲड. उदयसिंह पाटील – उंडाळकर यांनी मनाचा मोठेपणा दाखवून टाकलेले पाऊल महत्वाचे आहे. काँग्रेसची जुळणी करणे ही काळाची गरज आहे. प्रतिसरकार स्थापन झालेल्या सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ही अवस्था होणे वाईट आहे.

त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. मात्र, त्या खोलात न जात काँग्रेसला जुने दिवस आणण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न करू. अवघड वाटत असलेतरी अजूनही स्थिती अटोक्‍यात येऊ शकते. त्यामुळे आजचे मनोमिलन जिल्ह्यातील राजकीय दिशा बदल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरवात कऱ्हाड तालुक्‍यातून झाली आहे. निवडणूक झाल्यानंतर उदयसिंह पाटीलांची भेट झाली. त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते विलासकाकांच्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी घरी गेलो. तेथे चर्चा झाली तेव्हा काकांनी माझ्या घरातील एकही व्यक्ती जातीवादी पक्षात जाणार नाही.

आमच्या घराला स्वातंत्र्यसैनिकांची पंरपरा आहे, असा विश्‍वास दिला. त्यातून त्यांचे आशीर्वाद घेत मनोमिलनाची पाऊले पडली. मागच्या काही गोष्टी झाल्या असतील मात्र, त्या सर्व गोष्टी विसरून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मंत्री बाळासाहेब थोराताची भेट घेतली. त्यांना कऱ्हाडला येण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीमध्ये मनोमिलनाची नांदी येथे होत आहे. हे मनोमिलन जिल्ह्याला दिशा देणारे असेल. जिल्ह्यातील राजकीय स्थिती बदल्याशिवाय राहणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER