
कोल्हापूर : गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांचे हेलिकॉप्टर आज दुपारी कोल्हापूरहून मुंबईला जाताना भरकटले. कोल्हापुरातच करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील शाळेच्या पटांगणावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आले. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, पालकमंत्री सतेज पाटील हे काल, गारगोटी येथील मौनी विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कॉग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. मात्र, हेलिकॉप्टरने १५ मिनिटाचे उड्डाण केल्यानंतर तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाच्या ध्यानात आले. यानंतर पोलीस यंत्रणेला सतर्क करुन हेलिकॉप्टरचे करवीर तालुक्यातील कोपार्डे येथील शाळेच्या पटांगणावर इमर्जन्सी लॅन्डींग करण्यात आले. यानंतर मंत्री पाटील मोटारीने मुंबईकडे रवाना झाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला