
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते कल्लाप्पांना आवाडे तसेच प्रकाश आवडे यांचे काँग्रेस पक्षाचे 50 वर्षाचे घनिष्ठ संबंध आहेत. पक्षात त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह मध्यंतरी आवाडे यांची भेट घेण्यात आली होती. विविध पक्षाच्या वतीने आवाडे यांच्या भेटीगाठी सुरू असतात. मात्र त्यांनी अजून भाजपत जाण्याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.
काँग्रेसमध्ये त्यांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षानेच आमदार पी. एन. पाटील यांच्यावर आवाडे यांना पक्षात घेण्याची जबाबदारी दिली असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाला उर्जितावस्था देण्याचे काम सुरू आहे. केंद्र, राज्य यामध्ये पक्षाचे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात देखील काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करत आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत किंवा केंद्रीय कार्यकारिणीत बदल करण्याबाबत सध्यातरी कोणतीही चर्चा नाही, अशी माहिती पालकमंत्री पाटील यांनी दिली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार विनय कोरे यांना सोबत घेण्याबाबत अद्याप ही आपली चर्चा झालेली नाही. लवकरच कोरे यांच्याशी चर्चा केली जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला