महापोर्टलबाबत सतेज पाटलांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

Satej Patil acknowledges CM Thackeray thanks to the Maha Portal

कोल्हापूर : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महापोर्टल बंद करण्याच्या निर्णयाबाबत गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांनी आभार व्यक्त केले.

महापोर्टल मधील असणाऱ्या असंख्य त्रुटींमुळे महाराष्ट्रातील लाखो तरुणांच्या भविष्याशी खेळ होत होता. याबद्दल माझ्यासह महाविकासआघाडीच्या सर्वच नेत्यांनी आवाज उठवला होता.

हे पोर्टल बंद करणे हा महाविकास आघाडीच्या अग्रक्रमावरचा मुद्दा होता. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान खात्याच्या राज्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारल्यानंतर हा मुद्दा प्राधान्याने सोडवण्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधीची बैठक मी घेतली होती, असे प्रसिध्दी पत्रकात नामदार पाटील यांनी म्हटले आहे.

सीएए विरोधातील महामोर्चाच्या संयोजकांनी मानले मुश्रीफ आणि सतेज पाटलांचे आभार

विद्यार्थ्यांच्या तीव्र भावना, आलेले अनुभव आणि महापोर्टल मधील त्रुटी लक्षात घेतल्यानंतर हे पोर्टल बंद करणे हा एकमेव उपाय होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी जनतेच्या मनात असणारा हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे मन: पूर्वक आभार. या तरुणाईच्या उज्जवल भविष्यासाठी एक पारदर्शी व सक्षम व्यवस्था महाविकास आघाडीचे हे सरकार उभारेल याची मला खात्री असल्याचे सतेज पाटील म्हणतात.