साताऱ्याच्या सुनेला 370 कलम हटवल्याचा असा झाला लाभ

Suman Bhagat - Ajit Patil - Article 370Suman Bhagat - Ajit Patil - Article 370

सातारा : जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) महिलने राज्याबाहेर विवाह केला, तर पूर्वी तिला वारसा हक्क आणि संपत्तीसंबंधी कोणतेच अधिकार मिळत नव्हते. मात्र सातारा कराडच्या सूनबाई झालेल्या सुमन भगतला आता आई-वडिलांच्या मालमत्तेवर पाणी सोडावे लागणार नाही. 370 कलम (Article 370) हटवल्याचा लाभ या महिलेला मिळाला आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या कराडच्या अजित पाटील यांनी नुकताच काश्मीरच्या सुमनदेवीसोबत विवाह केला.

काश्मीरमधील मूल निवासी तरुणीने राज्याचा मूल निवासी नसलेल्या तरुणाशी विवाह केल्यास 2002 पर्यंत त्या तरूणीला वडिलोपार्जित संपत्तीतील अधिकारही मिळत नसे. मात्र 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयाद्वारे हा भेद दूर केला. कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचाही जनतेला मोठा फायदा झाला आहे. अजित प्रल्हाद पाटील हे कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी. भारतीय सैन्य दलात सैनिकी शिक्षणाचे तो प्रशिक्षण देतो. सध्या तो झाशीत कार्यरत आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या काश्मीरच्या सहकार्याकडे पाहुणी म्हणून आलेल्या जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱ्या सुमन देवी भगतशी त्याची भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी विवाह केला.

त्यापूर्वी काश्मीरबाहेरच्या रहिवाशांना राज्यात मालमत्ता खरेदी करण्याची परवानगी नव्हती. एखाद्या तरुणीने काश्मीरबाहेर लग्न केलं तरी तिलाही मुभा नव्हती. एकप्रकारे लग्नानंतर तिचं काश्मीरचं नागरिकत्वच धोक्यात यायचं. मात्र कलम 370 हटवल्यानंतर कोणीही काश्मीरमध्ये मालमत्तेची खरेदी करु शकतो. कराडचे अजित पाटील यांना झाला असून ते आता काश्मीरचे जावई झाले आहेत. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या पाटील यांनी काश्मीरच्या सुमनदेवीसोबत विवाह केला. आधी किस्तवाडमध्ये काश्मिरी पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली, तर नंतर कराडमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह करण्यात आला. सरकारने जर 370 कलम हटवले नसते तर आम्ही लग्न करु शकलो नसतो, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER