भाजपाच्या किसान मोर्चाची पडझड, उपाध्यक्षांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

कराड : सातारा (Satara) जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या (BJP) किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वासराव सावंत यांच्यासह जिल्ह्यातील किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या नेत्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत (Shivsena) प्रवेश देण्यात आला.

काही दिवसांपूर्वी नाशिकमध्येही भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब सानप यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही पक्षप्रवेशाचा धडाका सुरू करण्यात आला आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यांतून भाजपचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सानप यांच्या भाजपा प्रवेशानंतर नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं दिसते.

सांगलीतही शिवसेनेने भाजपाला धक्का दिला आहे. भाजपाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला होता.

हे गेलेत

भाजपाचे माजी सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे, सावर्डेचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप माने पाटील, तासगावचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील, तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती कवठे एकंद गावचे जयवंत माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER