सातारा पोलीस रुग्णालय आदर्शवत : रामराजे निंबाळकर

सातारा: सातारा जिल्हा पोलीस (Satara Police) दलातर्फे पोलीस व नागरिकांसाठी सुरू केलेले ऑक्सिजनयुक्त कोविड हॉस्पिटल राज्यात आदर्शवत ठरेल. या हॉस्पिटलचे नाव ‘चैतन्य’ असल्याने ते निश्चित समाजाला चैतन्य देईल, असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी काढले. येथील पोलीस कवायत मैदानावर या हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.

पोलीस दलावर वाढत चाललेला कोरोनाचा विळखा यामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अवघ्या आठ  दिवसांत ऑक्सिजनयुक्त हॉस्पिटल उभारणी केली. रविवारी सायंकाळी याचा लोकार्पण सोहळा पार पडला. रामराजे यांच्यासह पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ. जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची उपस्थिती होती.

कोरोनाची परिस्थिती सर्वांची चिंता वाढवणारी आहे. या परिस्थितीचा सर्वांनी सामना करूया. पोलिसांसाठी व जिल्हावासीयांसाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही सर्व प्रयत्न करत असल्याची ग्वाही यावेळी लोकप्रतिनिधींनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER