विधानसभेनंतर ग्रामपंचायत निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या नेत्याला धक्का

मुंबई : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल (Grampanchayat Election Result) येण्यास सुरुवात झाली आहे. अशात हाती आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे साताऱ्यातील दिग्गज नेते शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतील सुरुवातीच्या काही निकालांनीही शशिकांत शिंदे यांची निराशा केली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील मंगळापूर, पेठ कीन्हई व कठापूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांना धक्का देत आमदार महेश शिंदे गटाने सत्ता स्थापने केली आहे.

मंगळापूरमध्ये महेश शिंदे गटास 7 तर शशिकांत शिंदे गटास 0 जागा मिळाल्या, जागा पेठ कीन्हईमध्ये आ.महेश शिंदे गटास 5 तर शशिकांत शिंदे गटास 4 जागा, कठापूरमध्येही महेश शिंदे गटास 5 तर शशिकांत शिंदे गटास 4 जागा मिळाल्या आहेत.

दुसरीकडे, कराडमध्ये मात्र राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे. कारण कराड ग्रामपंचायतीमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे पॅनेल विजयी झालं आहे.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील(Balasaheb Patil) यांच्या पॅनेलने विरोधकांचा 8-1 ने धुव्वा उडवला आहे. साताऱ्यात मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. साताऱ्यातील इतर ग्रामपंचायतींचा निकाल काय लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ही बातमी पण वाचा : ग्रामपंचायत निवडणूक : मतमोजणीला सुरूवात, शिवसेना आणि भाजपची आघाडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER