जिल्हा बँकेच्या ठरावावरून सरपंचाच्या डॉक्टर पतीचे अपहरण

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या ठरावावरून म्हसवड येथील पानवण गावातील डॉ. नाना शिंदे (Dr. Nana Shinde) यांचे अपहरण (kidnapping) झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. नाना शिंदे यांच्या पत्नी या गावच्या नवनिर्वाचित सरपंच आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय पार्श्वभूमी असल्याचा अंदाज पॉलिसांकडून व्यक्त केला जात आहे.म्हसवड तालुक्यातील पानवण गावात असणाऱ्या शेतात काल संध्याकाळी कामानिमित्त गेलेले डॉ. नाना शिंदे रात्री उशीरापर्यंत परत आले नसल्याने घरच्या लोकांनी शोध घेतला. यामध्ये शेतालगतच्या रस्त्यावर त्यांची चारचाकी गाडी आढळली.

त्या गाडीची तोडफोड झालेली होती. तसेच गाडीच्या मागील सीटवर अॅसिड सांडल्याचे निदर्शनास आले. मात्र डॉ. शिंदे यांचा शोध लागू शकला नाही. नातेवाईकांनी म्हसवड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात अपहरण केल्याची तक्रार दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER