सातारा : पोलिस अधीक्षकांच्या ९४ वर्षीय आजींची कोरोनावर मात

Satara

सातारा : सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ९४ वर्षीय आजींना कोरोनाचा संसर्ग झाला होता. १२ दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. त्यांच्यावर कराड येथे उपचार सुरू होते.दरम्यान एसपी बंगल्यावरील तब्बल ८ पोलिसही कोरोनाबाधित झाले होते त्यांनी देखील कोरोनावर यशस्वी मात केली. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या ९४ वर्षीय आजी जाईबाई रंगनाथ उंदरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर कराड येथे रूग्णालयात उपचार सुरू होते. या दरम्यान १२ दिवसांनी त्या उपचाराला प्रतिसाद देत कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER