केंद्राला साष्टांग नमस्कार करतो; पण लोकांना तडफडू देऊ नका : हसन मुश्रीफ

PM Narendra Modi - Hasan Mushrif

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, याच वेळी ऑक्सिजन, रेमडेसिवीर, बेड या गोष्टींची कमतरता जाणवू लागली. ऑक्सिजनअभावी काही रुग्ण दगावले. रेमडेसिवीरचा काळाबाजार सुरू असल्याची प्रकरणे समोर आली आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून निशाणा साधला आहे.

हायकोर्टात जनहित याचिका

दरम्यान, भाजपाचे (BJP) नगरचे खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी हिमाचलप्रदेशहून रेमडेसिवीर (Remdesivir) आणल्याचा उल्लेख हसन मुश्रीफ यांनी केला. “सुजय विखे- पाटील यांनी काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीर आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेतले. हिमाचलप्रदेशमधून त्यांनी दोन  हजार रेमडेसिवीर आणले. केंद्राचे नियंत्रण असताना हे इंजेक्शन त्यांना कसे मिळाले? त्यांनी प्रशासनाला द्यायला हवे होते. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते रेमडेसिवीरचे वाटप कसे केले? या रेमडेसिवीरची शुद्धता तपासली गेली का? अशी जनहित याचिका कोर्टात दाखल झाली आहे. यावर २९ एप्रिल रोजी सुनावणी आहे.” असे मुश्रीफ यांनी सांगितले.

“आम्ही केंद्राला साष्टांग नमस्कार करतो. लोकांना तडफडू देऊ नका, मरू देऊ नका. हवं तर भाजपाच्याच लोकांना रेमडेसिवीर इंजेक्शन द्या. पण लोकांना तडफडू देऊ नका, त्यांच्या कुटुंबीयांना वाचवा, अशी विनंती माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) आहे.” असे मुश्रीफ म्हणाले.

ही बातमी पण वाचा : अतिदुखापत रुग्णांना रेमडेसिवीर मोफत; योगी आदित्यनाथ यांचा निर्णय

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button