सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण ; रुग्णालयात दाखल

Mohan Bhagwat

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत(Mohan Bhagwat) यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह (Mohan Bhagwat’sRTPCR test positive)आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्याने त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात ( Kingsway Hospital) दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संघाने शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनीदेखील रात्री उशिरा याबाबत ट्विट केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. त्यांना लवकरच बरं वाटावे , अशी देवाकडे प्रार्थना करतो, असे गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button