कोल्हापुरातील सरपंच आरक्षण मंगळवारी होणार

Daulat Desai - Gram Panchayat

कोल्हापूर : जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या २०२० ते २०२५ या पाच वर्षांसाठीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी मंगळवारी फुटणार आहे. मंगळवारी दि. १५ डिसेंबरला सरपंच आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयस्तरावर काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) यांनी दिले आहेत. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आवश्यक मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत ही सोडत काढली जाणार आहे.

जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींसाठी पुढील पाच वर्षांचे आरक्षण मार्च महिन्यात काढण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली होती. ग्रामबिकास विभागाने दि. १ डिसेंबर रोजी आवश्यक ती खबरदारी घेऊन स्थगित आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच आरक्षण सोडत घेण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींपैकी ५१३ सरपंचपद खुलासह विविध संवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. अनुसूचित जाती साठी 138 पदे राखीव असतील, त्यापैकी 59 पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील बारा तालुक्यांच्या ठिकाणी ही सोडत होणार आहे . अनुसूचित जमाती प्रवर्ग महिला जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग 277, सर्वसाधारण प्रवर्ग महिला आणि पुरुष 602 अशी सोडत निघणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER