१३ वर्षीय सरोज खान यांनी चार मुलांच्या वडिलांशी केले होते लग्न; वयांमध्ये ३० वर्षांचा होता फरक

Saroz Khan

बॉलिवूड अभिनेत्यांना नाचवणाऱ्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांनी या वर्षी ३ जुलै रोजी जग सोडले. त्यांनी आपल्या कारकीर्दीतील प्रत्येक मोठ्या कलाकाराला नृत्य शिकवले. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यासारख्या अभिनेत्रींच्या जबरदस्त नृत्यामागे सरोज खान यांचा हात होता. ते सर्व त्यांना मास्टर म्हणत असत. बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी त्यांना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. सरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे खरे नाव निर्मला नागपाल होते, हे फार कमी लोकांना माहीत आहे.

त्यांच्या वडिलांचे नाव किशनचंद सद्धू सिंह आणि आईचे नाव नोनी सद्धू सिंह होते. फाळणीनंतर सरोज खान यांचे कुटुंब पाकिस्तानमधून भारतात आले. अवघ्या तीन वर्षांच्या असताना सरोज खान यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केल्या. ५० च्या दशकात सरोज खान यांनी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करण्यास सुरुवात केले. नृत्य दिग्दर्शन बी. सोहनलाल यांच्याकडून त्यांनी नृत्य प्रशिक्षण घेतले होते. सोहनलाल यांना १३ वर्षांची सरोज खान आवडली आणि त्यानंतर त्यांनी सरोज यांच्याशी लग्न केले.

त्यावेळी सोहनलाल ४३ वर्षांचे आणि चार मुलांचे बाप होते. त्यावेळी सरोज खान यांना लग्नाचा अर्थसुद्धा माहीत नव्हता. सोहनलालपासून सरोज खान यांना दोन मुले झाली. काही काळानंतर दोघे वेगळे झाले आणि सरोज खान यांनी पुन्हा लग्न केले नाही. त्यांनी दोन्ही मुलांना वाढवले. या दरम्यान, त्यांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला. १९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाने सरोज स्वतंत्र कोरियोग्राफर झाल्या.

तथापि, त्यांच्या कार्याची ओळख खूप नंतर झाली. ‘मिस्टर इंडिया’, ‘नगीना’ , ‘चांदनी’, ‘तेजाब’, ‘थानेदार’ आणि ‘बेटा’च्या गाण्यांनी जोरदार धडक दिली आणि सरोज खान बॉलिवूडच्या मोठ्या नृत्य दिग्दर्शकांमध्ये गणल्या गेल्या. त्यांनी ३००० पेक्षा जास्त गाण्यांमध्ये कलाकारांना नृत्य करण्यास शिकवले. बॉलिवूड त्यांचे योगदान कधीही विसरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER