सरनाईक अन् वायकरांचे भुयारी गटार थेट कलानगरकडे जाते; नितेश राणेंचा ठाकरेंना टोमणा

Nitesh Rane & CM Uddhav Thackeray

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shivsena MLA Pratap Sarnaik) यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) धाड टाकल्यानंतर भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोमणा मारला – ‘मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचे भुयारी गटार थेट कलानगरकडे जाते.

ईडीचा तपास आणखी खोलवर झाला तर ते बरोबर कलानगरमध्ये पोहचतील.’ कलानगर येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचे भुयारी गटार थेट कलानगरकडे जाते. ईडीचा तपास आणखी खोलवर झाला तर ते बरोबर कलानगरमध्ये पोहोचतील. चुकीचे काही झाले असेल म्हणूनच ईडीने कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक आणि रवींद्र वायकर हा तर एक मुखवटा झाला. त्यामागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे, असे राणे म्हणाले.

किरीट सोमय्या

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात सुरू असलेल्या धाडीचे स्वागत केले. ‘शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कंपन्यांच्या कार्यालयांवर धाडी टाकल्या जात आहेत. बेनामी, बोगस आणि भ्रष्टाचाराचा पैसा असेल तर कारवाई व्हायला हवी. शिवसेनेचे नेते आणि त्यांचे मुखियादेखील अशाच प्रकारचे उद्योग करतात हे सगळ्यांना माहीत आहे.’ असा टोमणा सोमय्या यांनी मारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER