सरदार वल्लभाई पटेल देशाचे ‘राष्ट्रपिता’ – परेश रावल

Paresh Rawal

भारताचे पहिले उप-पंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे राष्ट्रपिता होते, या शब्दात अभिनेता व माजी खासदार परेश रावल (Paresh Rawal) यांनी पटेलांना जयंती निमित्त आदरांजली अर्पण केली.

पटेल याना आदरांजली अर्पण करताना केलेल्या ट्विटमध्ये रावल म्हणालेत – ‘माझ्या विनम्र मतानुसार आणि कोणाच्याही भावना न दुखवता मला असे वाटते की सरदार वल्लभाई पटेल हे आपले राष्ट्रपिता होते. त्यांनी देश संघटित ठेवला.’

परेश रावल यांच्या ट्विटला लाइक करत अनेकांनी आपली वेगवेगळी मत मांडली. काही लोकांनी परेश रावल यांच्या या मताला पाठिंबा दिला तर काही लोकांनी त्यांचे मत चुकीचे असल्याचे म्हटले. परेश रावल यांनी लोकांच्या मतावर काहीच उत्तर दिले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER