‘सारथी’ला पुन्हा मिळाली स्वायतत्ता

- मराठा मोर्चाची आणखी एक मागणी मान्य

सारथी

पुणे : मराठा मोर्चाची (Maratha Morcha) आणखी एक मुख्य मागणी सरकारने मान्य झाली. मराठा, कुणबी समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’ म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला पुन्हा स्वायतत्ता बहाल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मराठा मोर्चाची ही आग्रही भूमिका होती. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यासाठी मोथे आंदोलन उभारले होते.

सारथीची स्थापना मराठा, कुणबी आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचा सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार आल्यानंतर या संस्थेला जाणीवपूर्वक बंद पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होता.

खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी सारथीसाठी ११ जानेवारीला पुण्यात १ दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. ‘सारथी बचाव’ अशी हाक देत मराठा समाजातील (Maratha Community) तरुणांनी खासदार संभाजीराजे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला होता. ‘सारथी’ला बदनाम करण्यात येते आहे, असा असा आरोप संभाजीराजे यांनी केला होता. अनेक दिवसांपासून मी याविषयी सर्व त्या स्तरावर पाठपुरावा करत आहे. पण निर्णय काही होताना दिसत नाही. म्हणून लाक्षणिक उपोषणाचा मार्ग मी निवडला आहे. लोकशाही मार्गाने, शांतता पूर्वक कुठलाही कायदा हातात न घेता आम्ही हा लढा उभारणार अशी घोषणा करत त्यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER