
भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर. सारा लाइमलाइटपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तिच्या लूकच्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत. सौंदर्याच्या बाबतीत सारा अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे दिसत आहे. सारा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे.