पाठ दाखवणाऱ्या ड्रेसमुळे सारा आणि मनीष मल्होत्रा झाले ट्रोल

Maharashtra Today

बॉलिवूड कलाकार फॅशनच्या नावाखाली काहीही करीत असतात. फॅशनचा अर्थ काही तरी चित्रविचित्र कपडे घालणे किंवा जास्तीत जास्त अंग प्रदर्शन कसे होईल याची पूर्ण काळजी घेऊन तयार केलेले कपडे म्हणजे फॅशन, असे बॉलिवूडमध्ये (Bollywood) मानले जाते. याची दीपिकापासून प्रियंकापर्यंत अनेक उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. आणि अशा फॅशनमुळे कलाकार ट्रोल झालेलेही आपण पाहिले आहेत. या यादीत आता सारा अली खानचाही (Sara Ali Khan) समावेश झाला आहे. प्रख्यात फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) सारासाठी एक ड्रेस तयार केला खरा; पण या ड्रेसमुळे दोघेही चांगलेच ट्रोल होऊ लागले आहेत.

मनीष मल्होत्राने खास सारासाठी नुकताच एक बॅकलेस ड्रेस (Backless Lehenga Blouse) तयार केला. हा ड्रेस साराने घातला आणि त्याचे फोटोसेशनही केले. साराचे या नव्या ड्रेसमधील तीन-चार फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर करण्यात आले. यापैकी काही फोटोंमध्ये ती पाठमोरी दिसत असून तिची संपूर्ण पाठ उघडी असल्याचे दिसत आहे. मात्र हे फोटो सोशल मीडियावर येताच युझर्सनी मनीष मल्होत्रा आणि सारावर तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. एका युझरने साराच्या फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे, ‘जेवढा कपडा लहंग्यासाठी वापरला आहे त्यातील थोडा ब्लाऊजवर लावायला हवा होता.

कोणती नववधू असा पूर्ण पाठ दाखवणारा ब्लाऊज घालेल?’ दुसऱ्या एका युझरने लिहिले आहे, ‘असा ब्लाऊज कोण घालेल भावा, ब्लाउजही विचार करीत असेल की, मी आता पडतो की नंतर पडतो.’ एका युझरने मनीष मल्होत्रावर टीका करताना लिहिले आहे, ‘डिझायनर, थोडा विचार करून कपडे तयार कर.’ तर आणखी एका युझरने लिहिले आहे. ‘हा किती घाणेरडा ड्रेस आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button